मार्बल सखी योजनेची अभिमानास्पद सुरुवात : पहिल्या मार्बल सखीची नियुक्ती ✨

Maarble Sakhi, Mrs. Shital Sagar Dhas

SOCIAL-MAARBLE

5/16/20261 min read

आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला. 🌿✨

मार्बल ऑर्गॅनिक्स (हिरकणी महिला बचत गट - रेवनगाव) यांच्या “मार्बल सखी” योजनेअंतर्गत आमच्या पहिल्या मार्बल सखी म्हणून श्रीमती शीतल सागर धस, विश्रामबाग (सांगली) यांची नियुक्ती करण्यात आली. उमेदच्या सहकार्याने राबविण्यात येणारी ही योजना महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

मार्बल सखी या आपल्या परिसरातील अधिकृत विक्री व मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून काम करणार आहेत. त्यांना मार्बल आयुर्वेदिक कॉस्मेटिक उत्पादनांची विक्री, प्रचार आणि ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळणार आहे. यासाठी त्यांना विशेष मार्केटिंग किट देण्यात आली असून त्यामध्ये ७५ बॉटल्स, स्टँडी, आउटलेट बॅनर, स्टॉल बॅनर, ब्रोशर, व्हिजिटिंग कार्ड, डायरी व बॅच यांचा समावेश आहे. 💐

ही योजना महिलांना कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देत असून, त्यातून नियमित उत्पन्न मिळवून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यास मदत करणार आहे. तसेच महिलांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि उद्योजकता विकसित करण्यासाठीही ही योजना उपयुक्त ठरणार आहे.

मार्बल सखी योजना ही फक्त उत्पादन विक्रीपुरती मर्यादित नसून, ग्रामीण व स्थानिक स्तरावर महिलांच्या सक्षमीकरणाचा एक प्रेरणादायी उपक्रम आहे. भविष्यात अधिकाधिक महिलांनी या योजनेत सहभागी होऊन स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा, हीच आमची अपेक्षा. 🌸

Maarble Organics

It's Simply Ayurveda, बाकी कुछ नाही!!

Address: Maarble Organics

(A unit of Victribell Enterprises Pvt Ltd)

A/p-Rewangaon, Tal-Khanapur, Dist-Sangli, MH-415311

Contact us:

marbleorganics@gmail.com

+91-7447356256

© 2024. All rights reserved.